गावाविषयी माहिती

  • महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात चिंचघर हे गाव आहे.

  • चिंचघर गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पालघर सुमारे ७४ कि.मी. अंतरावर आहे.

  • चिंचघर गावापासून तालुक्याचे ठिकाण वाडा सुमारे १६ कि.मी. अंतरावर आहे.

  • चिंचघर गावाचे क्षेत्रफळ सुमारे २३०.५४ हेक्टर आहे.

  • २०११ च्या जनगणनेनुसार चिंचघर गावाची एकूण लोकसंख्या २,२८७ आहे.

  • २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ५४६ कुटुंब चिंचघर गावात राहतात.

  • २०११ च्या जनगणनेनुसार गावात पुरुषांची संख्या १,२१९ असून महिलांची संख्या १,०६८ आहे.

भौगोलिक स्थान

वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने जाऊन पुढे गौरापूर-कुडुस मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे.

लोकजीवन

हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५४६ कुटुंबे राहतात. एकूण २२८७ लोकसंख्येपैकी १२१९ पुरुष तर १०६८ महिला आहेत. गावाची साक्षरता ८६.८३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९१.८० आहे तर स्त्री साक्षरता ८१.१९ आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या ३१३ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १३.६९ टक्के आहे. मुख्यतः कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

लोकसंख्या

घटक संख्या
लोकसंख्या २२८७
पुरुष १२१९
स्त्री १०६८
एकूण २२८७

संस्कृती व परंपरा

चिंचघर गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,पोळा यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत गावदेवी मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

गणपती मंदिर   – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे श्री. चिंतामणी मयुरेश्वर हे गणपतीचा मंदिर आहे.  या ठिकाणी चतुर्थीच्या दिवशी मोठ्या संख्येने भक्त येत असतात आणि गणेश जयंतीच्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

वाचनालय -ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मुलांसाठी वाचनालय सुविधा उपलब्ध आहे. या वाचनालय मध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धा परीक्षा पुस्तके तसेच रोजचे वृत्तपत्र देखील उपलब्ध असत हे वाचनालय सर्वांसही विनामुल्य आहे. येथे बसण्याची व्यवस्था आहे. मुलांना आणि मुलीना अभ्यासासाठी वेगवेगळय खोल्या आहेत. त्यामध्ये मुलीसाठी आणि मुलांसाठी वेगवेगळे स्वच्छता गृहांची सुविधा आहे.

स्मशानभूमी - ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्मशानभूमी आहे. त्याठिकाणी पाण्याची  आहे. स्मशानभूमी कडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. स्मशानभूमी भोवती वा᳴ल कंपाउड आहे.

व्यायाम शाळा - गावातील लोकांसाठी मुलांसाठी व्ययामशाळा आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात व्यायाम शाळा आहे.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र - ग्रामपंचायत चिंचघर कार्यक्षेत्रात उपकेंद आहे. त्यामध्ये सर्व लोकांची तपासणी करून त्यांना गोळ्या औषधे दिली जातात तसेच रक्तदाब रुग्ण आणि मधुमेह रुग्णाची नियमित तपासणी केली जाते. व त्यांना गोळ्या औषधे दिली जातात. आरोग्य शिबीर भरवले जातात. तसेच गरोदर मतांची तपासणी केली जाते. महिन्यातून एकदा लहानमुलांना लसीकरण दिले जाते.

जवळची गावे

चिंचघर  गाव वाडा  तालुक्यातील पश्चिमेस असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

आसपासची प्रमुख गावे आहेत.

कोणसई, जमाघर, नेहरोळी, लखमापूर, खुपरी, विजयगड, डोंगस्ते, बिलावली, बुधावली, गुंज, कटी  ही जवळपासची गावे आहेत.